Posts

Showing posts from February, 2026

Enjoyed Saturday

 सर्वांना नमस्कार,  काल म्हणजे शनिवारी लोकशाहीचा उत्सव मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. मतदान अधिकारी म्हणून सर्व मतदार वेळेत व शांततेत मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झाले . मतदारांनी आपल्या उमेदवाराला मतदान यंत्रामध्ये मत दिलेले आहे. थोड्याच दिवसात निकाल लागेल. यासाठी संपूर्ण यंत्रणा अतिशय जबाबदारीने काम करत होती .अतिशय काटेकोर नियोजन याबाबतीत करण्यात आले होते.  यासाठी सर्व शिक्षक अतिशय मेहनत घेत होते.  त्याचप्रमाणे सरकारी विभागातील सर्व कर्मचारी यांनी पण  चांगली मेहनत घेतली .तसेच तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी यांचेही प्रॉपर नियोजन होते. सर्वांना धन्यवाद. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या एचएससी परीक्षेसाठी पुन्हा शिक्षक तत्पर. सीटीईटी परीक्षा, निवडणूक प्रक्रिया आणि पुन्हा बोर्ड एक्झामिनेशन यासाठी शिक्षक तत्पर आहेत .सर्वांना पुन्हा एकदा पुढील परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा ! विशेष धन्यवाद ... निवडणुकीमध्ये वयस्कर, अंध, अपंग सहभागी होऊन ज्यांनी आपले मतदान केले .तसेच या काळात त्यांच्या घरातील व्यक्तींनी त्यांना सहभागी करून घेतले.